संस्था परिचय

:मुलांना पंख आहेत आपण त्यांना आकाश देवू :

रस्ता घडणीसाठी मनुष्य घडणीचे शिक्षण , या विवेकानंद यांच्या विचारला प्रेरित होऊन शिक्षणाचे कार्य करणारी संस्था विद्यालयात येणाऱ्या प्रत्तेक मुलाचे रुपांतर माय भूमीवर व श्रमिक जनतेवर प्रेम करणाऱ्या प्रामाणिक सत्यशील मेहेनती सहुदयअन्यायाची चीड असलेल्या दुस्प्रवृती आणि विनम्र निकोप व तकतवान गौरवशाली देश्भाक्तात व्हावे हा या सास्थेच प्रमुख उद्देशआहे शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या मुलभूत क्षमतांच व त्याच्या सुप्त गुणांचा , त्याच्या श्रुजान्शिल्तेचा उपयोग देश कार्यासाठी करणे या साठी हि संस्थाप्रयत्नशील आहे शिक्षण घेतांना क्षणोक्षणी मिळणारा आनंद विद्यार्थांना देणे व आधुनिक युगाची कास धरून ग्लोबल नागरिक तयार करणे यासाठी संस्था ध्यास घेते

डॉ. विकास हरताळकर,श्री घानाश्यामभाई अग्रवाल,डॉ विजय पोतदार,वकिल श्री रवींद्र जैन,श्री सुधाकर केंगे व श्रीमती मंगला जोशी यांनी कृतीशील शिक्षण देणारी व देशप्रेम वाढीस लावणारी संस्था विवेकानादांच्या विचारला प्रेरित होवून १९८७साली सुरु केली आज १३ विद्यार्थ्यांपासून १६०० विद्यार्थांपर्यंत विस्तार झाला आहे श्री सुधाकर केंगे यांच्या शैक्षणिक अभ्यासातून संस्थेला विशिष्ट ध्येय लाभले आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा संस्थेला होत आहे .

जळगाव जिल्ह्यातील चोपडा या तालुक्याच्या गावी संस्थेने बाल वर्गापासून शिक्षण देण्यास सुरुवात केली व आज संस्थेच्या एकूण ६ एकर परिसर आहे . यापरिसरात प्राथमिक विभाग , माद्यामिक विभाग, बाल संस्कार केंद्र , व्यायाम शाळा संगणक केंद्र लहान मुलांसाठी व्यायाम शाळा व शारीरिक विकासासाठीउपयुक्त असे २ एकर चे क्रीडांगण उपलब्ध असून त्याच्या सहाय्याने विद्यार्थी खेळत प्राविण्य मिळवितात शाळेत येण्या- जाण्या साठी संस्थेच्या ३ बस चीव्यवस्था केली आहे विद्यार्थ्यांच्या जडण घडणीत त्यांना प्रत्येक क्षणाला मार्गदर्शन करणारा प्रशिक्षित व ध्येय प्रेरित अध्यापक वर्ग येथे कार्यरत आहे .

विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे एक शैक्षणिक केंद्र म्हणून १९८९ पासून विद्यालयाचे कार्य सुरु आहे. गेल्या २५ वर्षात विद्यालयाने शैक्षणिक संकुलाबरोबरच, संगणक प्रशिक्षणाची सोय , अद्यावत व्यायाम शाळा, ग्रंथालय , प्रयोग शाळा इत्यादीं सोयींनी युक्त अशी व्यवस्था केली आहे .

विवेकानंदांच्याशैक्षणिक विचाराने प्रेरित होऊन कार्य सुरु आहे गेल्या २५ वर्षात अनेक वैशिस्था पूर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे चोपडा परिसरातनाविन्यपूर्ण गोष्टींचा पायंडा पडून स्वताचे असे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे विद्यालयाचा एकूण ४ एकर चा परिसर आहे यात २ एकर क्रीदान्गानासाठी जागा राखून ठेवण्यात आला आहे .प्रशस्त क्रीडांगण याचा उपयोग करून विद्यार्थीविविध खेळात प्राविण्य मिळवितात परिसरात सर्व सोयीनी युक्त असे व्यायामशाळा , संगणक कक्ष,ग्रंथालय ,वाचन कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा , इत्यादीउपलब्ध आहे .

तसेच प्रत्येक क्षणाला मार्गदर्शन करणारा प्रशिक्षित व ध्येय प्रेरित अध्यापक वर्ग येथे कार्यरत आहे विद्यालयात शैक्षणिक उपक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रमही राबविले जातात

विद्यालयास महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षणिक व संशोधन परिषद पुणे यांचा अभ्यासक्रम शिकविला जातो.पूर्व प्राथमिक ,प्राथमिक, माध्यमिक अश्या त्रिस्तरीय शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध आहे . सेमी इंग्रजी व इंग्रजी अश्या दोन्ही माध्यमातून शिक्षण दिले जाते

१) पूर्व प्राथमिक
२) प्राथमिक ( सेमी )
३) माध्यमिक (सेमी )
४) संपूर्ण इंग्रजी माध्यम शाळा

इतर विभाग
१) ग्रंथालय
२) व्यायामशाळा
३) प्रयोग शाळा

विद्यालयातील ३ ते ५ वर्षे या वयोगटातील विद्यार्थांसाठीचा हा विभाग आहे मानसशास्त्रीय दृस्तीकोनातून विद्यार्थांचा व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी विविध साधने व उपक्रमांची योजना या विभागातआहे तसेच भारतीय संस्कृतीची ओळख लहानपणापासून व्हावी या उद्देशाने अनेक सास्कृतिक उपक्रमांची व अभ्यासक्रमाची योजनाआहे या विभागात कृतियुक्त शिक्षणावर अधिक भर देण्यात आला आहे

विभागाची वेळ :--
शिशु वर्ग (नर्सरी , बलांगण ) :--- ( ३ ते ४ वर्षे ) सोमवार ते शनिवार स. ८.३० ते १०.३० ( दोन्ही माध्यम )
बाल वर्ग ( बालवाडी छोटा गट) :--(४ ते ५ वर्षे ) सोमवार ते शनिवार स . ८.०० ते ११.३० ( दोन्ही माध्यम )
बाल वर्ग ( बालवाडी मोठा गट ) :--(५ ते 6 वर्षे ) सोमवार ते शनिवार स . ८.०० ते ११.३० ( दोन्ही माध्यम )

सदस्य चे फोटो

संस्था चालक

संस्थेचे अध्यक्ष

डॉ. विकास हरताळकर

उपाध्यक्ष

श्री घनश्यामभाई अग्रवाल

सचिव -

डॉ विजय पोतदार

सहसचिव -

अॅड.श्री रवींद्र जैन

कार्यवाह-

श्री सुधाकर केंगे व श्रीमती मंगला जोशी

आम्हाला संपर्क करा

विवेकानंद विद्यालय,कारगिल चौक जवळ,यवाल रस्ता,तालुका - चोपड़ा ,जिला - जलगाँव,महाराष्ट्र, पिन 425107
फ़ोन: +91 (02586) 220528
फैक्स: 1(234) 567 8910
E-mail: info@vivekanandavidyalaya.co.in